Monday, May 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडJalana मराठा मोर्चावर लाठीचार्ज व्हिडीओ : चौकशीचे आदेश, सर्वत्र निषेध

Jalana मराठा मोर्चावर लाठीचार्ज व्हिडीओ : चौकशीचे आदेश, सर्वत्र निषेध

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना येथील मराठा मोर्चावर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, ”झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या मागे पूर्ण सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही सरकराची भूमिका आहे. जो दुर्दैवी प्रकार घटना आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.” जालन्यातील शहागड येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २३ पुरुष तर २ महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक तरुणांच्या शरीरात छर्रे घुसल्यामुळे जखमी झालेले आहेत. या सर्व जखमी आंदोलकांवर वडीगोद्री येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू केले आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत आठ ते नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यात एका पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून राजकीय महाविकास आघाडी व कम्युनिस्ट पक्षाने लाठीमाराचा निषेध केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलकांच्या नेत्याचे उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय