Wednesday, May 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडSFI तर्फे स्वातंत्र्यदिनी 'आझादी रॅली' 

SFI तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘आझादी रॅली’ 

मंचर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ‘आझादी रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. आझादी रॅली सुरूवात पिंपळगाव चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे एसटी स्टँडसमोर रॅलीची सांगता झाली. 

यावेळी एसएफआय राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास, माजी राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, भास्कर म्हसे, राज्य सहसचिव मलेशम कारमपुरी, विलास साबळे, राज्य सचिवमंडळ सदस्य सायली अवघडे, अनुजा सावरकर, जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना रोहिदास जाधव म्हणाले, एसएफआय च्या वतीने देशभरात आदी रॅलीची आयोजन करण्यात आले आहे. देशातील लोकशाही बळकटी करण्यासाठी ही रॅली काढली जात आहे. देशातील वाढत्या हिंसाचारावर व अत्याचाराच्या घटनांवर केंद्र सरकार गप्प आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी रॅली काढत आहोत. देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ‌‌‌‌‌. यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी यांनीही मनोगत व्यक्त केले. 

रॅलीमध्ये जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, जिल्हा कमिटी सदस्य राजू शेळके, निशा साबळे, कांचन साबळे, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, सचिव समीर गारे, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, शहर अध्यक्ष अक्षय निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

Lic
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय