Saturday, July 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : औद्योगिक ऊर्जा संवर्धन स्पर्धेत 28 कंपन्यांचा सहभाग

PCMC : औद्योगिक ऊर्जा संवर्धन स्पर्धेत 28 कंपन्यांचा सहभाग

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने ऊर्जा संवर्धन 2024 स्पर्धा भोसरी येथील कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर (Quality excellence centre) येथे घेण्यात आली. स्पर्धेत 28 कंपन्यातील 174 स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यात 109 जणांना नामांकने प्राप्त झाले. (PCMC)

स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MSEDL) चे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. स्पर्धेचा समारोप पिरंगुट येथील अँचेम्को इंडिया प्रा.लि. कंपनीचे प्लांट हेड महेंद्र मगदूम यांच्या उपस्थितीत पार पडला. (pcmc)

ऊर्जा संवर्धन 2024 या विषयावरील स्पर्धेत कंपन्यांच्या संघाने सराव, अनुभव, सामायिक करण्यावर केस स्टडी प्रेसेंटेशन, स्लोगन आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व्हर्च्युअल प्रेझेंटेशन भोसरी येथे 31 रोजी होणार आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाखेचे कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, धनंजय वाघोलीकर, पवन कुमार रौंदळ, परविन तरफदार, कार्यकारी समिती सदस्य डॉ. संजय लकडे, प्रभूलिंग झुंजा यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे आयोजन पुणे शाखेचे प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रूमाले यांनी केले. pcmc news

स्पर्धेत सहभागी कंपन्या

अँचेम्को इंडिया प्रा.लि., अशोक आयर्न वर्क्स प्रा.लि., एएसएएल टाटा ऑटो स्टॅम्पिंग, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंब्लीज लि. चाकण, एनप्रो इंडस्ट्रीज प्रा., आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि., किर्लोस्कर ऑइल इंजिन–कागल, मॅक्सियन व्हील्स अल्युमिनियम इंडिया प्रा., मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड (सिक्युरिटी सिस्टीम डिव्हिजन) चाकण, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड डब्ल्यूएचडी-मुरबाड प्लांट, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड डब्ल्यूएचडी पुणे युनिट-2, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड डब्ल्यूएचडी पुणे युनिट-2, मिंडा इंस्ट्रूमेंटन्स लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (पाताळगंगा), रूप पॉलिमर्स लि., सारलोहा अडव्हांस, एसकेएफ इंडिया लि., टाटा ऑटोकॉम्प कंपोझिट डिव्हिजन, टाटा ऑटोकॉम्प कॅटकॉन एक्झॉस्ट सिस्टीम्स, युनो मिंडा लि., आसन विभाग, रांजणगाव, युनो मिंडा लि., रिंडर डिव्हिजन, पुणे, गॅब्रिएल इंडिया लि., देवास, थरर्मॅक्स बॅबकॉक अँड विलकॉक्स एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड – शिरवळ, टाटा मोटर्स–ईआरसी, सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग एमएफजी कॉर्पोरेशन प्रा.लि. प्लांट-3, सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग एमएफजी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड प्लांट-4, फोर्ब्स मार्शल, टाटा ग्रीन बॅटरी या कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय