Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयप्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमाची तुरुंगातून सुटका, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमाची तुरुंगातून सुटका, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

नोएडा : पाकिस्तानी महिला सीमा गुलाम हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना शनिवारी तुरुंगातून बाहेर आले. नोएडाच्या जेवर दिवाणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. सीमा हैदर (३०) आणि सचिन मीना (२५) या दोघांना पोलिसांनी ४ जुलै रोजी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याबद्दल अटक केली होती.

सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात घुसून एका अवैध स्थलांतरिताला आश्रय दिल्याप्रकरणी सचिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१९ मध्ये PUBG या ऑनलाइन गेमद्वारे दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. हिंदी चित्रपटालाही लाजवेल अशा रितीने पाकिस्तानी महिला आपल्या चार मुलांसह आपला देश सोडून थेट बेकायदेशीरपणे भारतात आली. ग्रेटर नोएडा येथे ती सचिन सोबत राहत होती.

सीमाने एनडीटीव्हीला सांगितले की, ‘माझे पती हिंदू आहेत, त्यामुळे मीही हिंदू आहे. मला आता भारतीय आहे असे वाटते.” ती म्हणाली, ”हा खूप लांब आणि कठीण प्रवास होता. मी खूप घाबरले होते. मी पहिल्यांदा कराचीहून दुबईला गेले, तिथे मी 11 तास वाट पाहिली आणि मला झोपही आली नाही. मग मी नेपाळला जाण्यासाठी फ्लाइट घेतली, तिथे मी सचिनला भेटले.

सीमावर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याचा आरोप आहे, तर सचिनवर अवैध स्थलांतरितांना आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सीमाला शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला आणि ती आता भारतात कायमस्वरूपी राहण्यासाठी कागदोपत्री कामात व्यस्त आहे. तिच्या सुटकेबद्दल बोलताना सीमा म्हणाली, ‘हे बातमी ऐकून मी आनंदाने रडले. मला वाटले की मी काही महिने तुरुंगात राहीन.

आता सीमा आणि सचिन या दोघांनाही आपल्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करायचा आहे. सीमा हैदरला आता इथेच राहायचे आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिचा प्रियकर सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.

हे ही वाचा :

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय