Monday, May 20, 2024
HomeनोकरीNurse : 'परिचारिका' पदांची भरती; आजच करा अर्ज !

Nurse : ‘परिचारिका’ पदांची भरती; आजच करा अर्ज !

TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय (Rajiv Gandhi Medical College) च्या आस्थापनेवरील “परिचारिका” संवर्गातील 72 रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (179 दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. 29/08/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे. (Recruitment of Nurse Posts)

● पद संख्या : 72 

● पदाचे नाव : परिचारिका

● शैक्षणिक पात्रता : 1. महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C) 2. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जी.एन.एम.) 3. बी.एस्सी . (नर्सिंग) असल्यास प्राधान्य. 4. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. 5. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ / परिचारिका / स्टाफ नर्स या कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव. 6. ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी.एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य. 7. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 

● नोकरीचे ठिकाण : ठाणे

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2023

मुलाखतीचा पत्ता : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

Recruitment of Nurse Posts
Recruitment of Nurse Posts
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय