Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याPolice Bharti : खुशखबर ! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यात मुदत वाढ

Police Bharti : खुशखबर ! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यात मुदत वाढ

Police Bharti : पोलिस भरती संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात जवळपास १७ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस भरतीसाठी (Police Bharti) प्रयत्न करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गृह विभागाकडून १७ हजार रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी ५ मार्च २०२४ पासून ऑनलाईन अर्ज केले जात असून या पोलिस भरतीसाठी आधी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र, राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यानुसार या भरतीत एसईबीसी प्रवर्गातील तरूणांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, शासन निर्णयानंतरही मराठा तरूणांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. शासनाच्या संकेतस्थळावर तशी सुविधा अद्याप उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर ‘एसईबीसी’साठी पात्र तरूणांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ३१ मार्चच्या मुदतीपर्यंत काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे एसईबीसीचे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती अर्जासोबत सादर करावी. मात्र, कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे जरूरी आहेत, असेही आदेशात नमूद आहे. (Police Bharti)

त्यामुळे सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५ एप्रिल २०२४ करण्यात येत आहे, असं गृह मंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय