Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : महापालिका रुग्णालयातील दरवाढीला नागरी समस्या निवारण समितीचा विरोध

पिंपरी चिंचवड : महापालिका रुग्णालयातील दरवाढीला नागरी समस्या निवारण समितीचा विरोध

पिंपरी चिंचवड, १९ जुलै : महापालिकेच्या वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शासन दराप्रमाणे आकारणी करून शहरातील मनपाच्या सर्व मोफत आरोग्यसेवा आणि मोफत उपचारामध्ये आता शासन नियमाप्रमाणे दरवाढ करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील घेतल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इंदिरा काँग्रेस पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी सह आयटक, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहित कष्टकरी जनता आघाडी, अपना वतन संघटना, मानवाधिकार, शिवशाही व्यापारी महासंघ, मराठा क्रांती मोर्चा, छावा मराठा युवा महासंघ इ संघटनांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी मोफत उपचार बंद करण्याच्या निर्णयाला आकुर्डी येथे जोरदार विरोध केला.

श्रमशक्ती भवन, आकुर्डी येथे निमंत्रक नागरी समस्या निवारण समितीचे निमंत्रक मारुती भापकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मनपा आयुक्तांनी दरवाढ मागे घ्यावी असा ठराव बैठकीत मांडला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मानव कांबळे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ठरावाला पाठिंबा देताना म्हणाले की, मनपाची आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत असावी. शहरातील गोरगरीब, सामान्य नागरिक यांना मोफत सर्वोपचार देण्याचे धोरण सुरवातीपासून आहे. ते बदलता येणार नाही, आयुक्तांनी ही दरवाढ मागे घ्यावी.

इंदिरा काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम म्हणाले की, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह सर्व रुग्णालये निर्माण करताना कामगार कष्टकरी वर्गाला मोफत उपचार देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यशासनाचे कोणतेही योगदान नसताना महापालिकेने शासन दराने दरवाढ करणे अतिशय चुकीचे आहे.

मनसेचे सचिन चिखले म्हणाले की, शहरात गोरगरीब अंगमेहनती रोजनदारी नागरिकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यांना मोफत आरोग्यसेवा मिळाव्यात, आयुक्तांनी केलेली दरवाढ लोकविरोधी आहे.

मानव कांबळे म्हणाले की, शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी आजच्या संयुक्त बैठकीमध्ये राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांचा समावेश असणारी पिंपरी चिंचवड शहर, नागरी समस्या निवारण समिती गठीत केली असल्याचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी सांगितले.

या बैठकीला अनिल रोहम, बाबा कांबळे, भाऊसाहेब अडागळे, देवेंद्र तायडे, धनाजी येळकर, गणेश दराडे, सचिन देसाई, गिरीश वाघमारे, सुदीप अडसूळ, धनंजय कांबळे इ विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी आयुक्तांनी दरवाढी निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा :

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय