पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : थेरगाव येथे गणेश नगर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी “जेष्ठ नागरिक संघ गणेशनगर थेरगाव येथे मतदार जन जागृती करतांना नगरपालिकेच्या दिव्यांग विभागातील सौ. वैशाली खरात, यांनी मतदान करणे, किती महत्त्वाचे आहे आणि पालिकेच्या जेष्ठ नागरिकां साठी काय सुविधा आहेत त्याबद्दल माहिती दिली. (PCMC)
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे यांनी नागरिकांना आव्हान केले की, आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका. मतदान सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे, आपलं मत, विकासाला मत. तुम हो महान, करो मतदान. ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो,मतदानाची किंमत नाही घेणार पण मतदान मात्र जरूर करणार,अशा प्रकारच्या घोषणा देऊन उपस्थित नागरिकांना मतदान करण्याची शपथ दिली.
सुभाष चव्हाण म्हणाले की, आपल्याला शासनाने दिलेल्या सुट्टीचा उपयोग फिरण्यासाठी,व मौज मजा ,किंवा भटकंती न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून महाराष्ट्राची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. (PCMC)
यावेळी नगरपालिकेच्या दिव्यांग विभागातील वैशाली खरात, अध्यक्ष विष्णुपंत तांदळे, श्रीमती कुमुदिनी घोडके, राजेंद्र परदेशी, नामदेव शेकोकर, प्रमोद वाळणकर, सुभाष चव्हाण, कृष्णा कळसकर, नरेंद्र जोशी, दिलीप टिंगरे, घारे ईश्वरदास, गोरे बापू, लोहार वसंत,अमृते सदानंद, पेटकर, ठाकरे पिसे रामचंद्र, उपस्थित होते.
अध्यक्ष विष्णूपंत तांदळे यांनी आभार मानले.
हेही वाचा :
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य