Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : संजोग वाघेरे पाटील यांची प्रचारासाठी "मॉर्निंग वॉक डिप्लोमसी"

PCMC : संजोग वाघेरे पाटील यांची प्रचारासाठी “मॉर्निंग वॉक डिप्लोमसी”

PCMC, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी निगडी प्राधिकरण येथील अप्पूघर येथील दुर्गा टेकडीवर ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे “मशाल” चिन्हाचे बटण दाबून मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले. (PCMC)

या वेळी शिवसेना पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, प्रचारप्रमुख योगेश बाबर, उपशहरप्रमुख अमोल निकम, वैभवी घोडके, संजय दुर्गुळे, निखिल दळवी, अमोल भोईटे, अभिजीत सोनके, विकास भिसे, बापू फाटांगरे, राजू जगदाळे,लाला लाहोटी, तेजस पवार, महेश पानसकर यांच्यासह महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी व्यायाम करणारे युवा तरुण, हास्ययोग आणि योगा ग्रुप यांच्याशी संपर्क साधून शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे पदाधिकाऱ्यांनिही मतदारांशी संपर्क साधला. या वेळी मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मॉर्निंग वॉक करताना नागरिकांच्या समस्याबाबत चर्चा केली. व त्या समस्या सोडवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले. गेल्या दहा वर्षात मतदार राज्याची सरकारने आश्वासनांचे गाजर दाखवून निव्वळ फसवणूकच केली आहे. मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच वाघेरे पाटील यांनी सर्व स्तरातील लोकांच्या भेटी घेत “मशाल” चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन या वेळी केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय