Monday, May 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिखली तळवडे भागात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

PCMC : चिखली तळवडे भागात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : तळवडे-चिखली परिसरातील त्रिवेणीनगर, सहयोगनगर, हनुमाननगर, ताम्हणेवस्ती, चिखली भागात गेले २/३ दिवसात अज्ञात व्यक्तींकडून नागरिक, कामगार व वाहनावर कोयत्याने वार करून जखमी केले असून, अनेकांचे मोबाईल चोरी केले असून यावर तातडीने कारवाई करावी तसेच याभागात गस्त वाढवावी व टॉवर लाईन भागात पोलिस संपर्क कक्ष स्थापन करावी अशा मागणी शिवसेना उपविभागप्रमुख प्रविण पाटील यांनी चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सचिन सानप, विभागप्रमुख नितीन बोंडे, शाखाप्रमुख सर्जेराव कचरे, अशोक गायकवाड, युवासेनेचे अमित शिंदे, वैभव गिरी, अभिषेक काळे, दिनेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Lic life insurance corporation
LIC
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय