Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणेकरांनो सावधान ! पुण्यात आढळला ओमीक्रोनचा नवा व्हेरिएंट 

पुणे : कोरोना (Covid-19) महामारीने जगभरात थैमान घातले होते. या महामारीतून जग सावरत असताना पुन्हा एकदा नव्या धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये ओमीक्रॉनचा नवा व्हेरीयंट धुमाकूळ घालत आहे. (Omicron was detected in the state in may) मात्र, पुण्यात मे महिन्यातच याचा एक रुग्ण आढळला होता असं समोर आलं आहे.

---Advertisement---

जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्राचे समन्वयक आणि बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी TOI शी बोलताना याबाबत माहिती दिली. “महाराष्ट्रात मे महिन्यात EG.5.1 आढळून आला होता. त्याचे निदान होऊन दोन महिने उलटून गेले आहेत आणि त्यात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. जून आणि जुलैमध्ये राज्यात या सबव्हेरियंटचा प्रभाव वाढलेला दिसला नाही. तर, राज्यात सध्या XBB.1.16 आणि XBB.2.3 या व्हेरियंटचा प्रभाव अधिक दिसत आहे.” असेही ते म्हणाले.

तर राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात जुलैच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 70 वर होती. 06 ऑगस्टपर्यंत ही संख्या 115 वर जाऊन पोहोचली आहे. सोमवारी (07 ऑगस्ट) राज्यामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 एवढी होती. गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोविड रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

---Advertisement---

दरम्यान, कोरोना महामारी आणि नवीन व्हेरिएंट पासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Lic
Lic life insurance corporation
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles