Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपोलिस आयुक्त कार्यालयावर शंभर संघटनांचा महामोर्चा

पोलिस आयुक्त कार्यालयावर शंभर संघटनांचा महामोर्चा

संभाजी भिडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
: संभाजी भिडे यांनी संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ होता, तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज असू शकत नाही, जण गण मन हे आपले राष्ट्रगीत असू शकत नाही,१५ आगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस नाही १५ ऑगस्टला काळा दिवस पाळून उपवास करावा असे बेताल वक्तव्य करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केलेला आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आईच्या चारित्र्यावर संशय घेवून महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरलेले आहेत. तसेच महात्मा फुले हा भडव्याच्या यादीतील समाज सुधारक आहेत.

संभाजी भिडे सातत्याने देश विघातक तसेच धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये समाजात अशांतता निर्माण होईल असे वारंवार वक्तव्य करत असून सत्ताधारी त्याला कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पाठीशी घालत आहेत त्यामुळे देशप्रेमी नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे भिडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा करण्यात या मागणीसाठी २८ जून २०२३ रोजी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती .

२९ जुलै २०२३ रोजी दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली होती परंतु या दोन्ही तक्रारीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ तसेच संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी विचारांचे पक्ष पुरोगामी विचारांच्या संघटना तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दळवी नगर येथून पोलीस आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे या महामोर्चामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध राजकीय पक्ष तसेच शंभरच्या वर सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय