Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसंस्कार भारती व नटेश्वर नृत्यकला मंदीर यांच्या वतीने शास्त्रीय नृत्य सादरीकरण

संस्कार भारती व नटेश्वर नृत्यकला मंदीर यांच्या वतीने शास्त्रीय नृत्य सादरीकरण

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती व नटेश्वर नृत्यकला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने, नृत्य मासिक सभा पुष्प २ अंतर्गत, ६ ऑगस्ट रोजी, विरंगुळा केंद्र, मोरवाडी, पिंपरी येथे शास्त्रीय नृत्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला होता.

संस्कार भारती पिंपरी चिंचवड नृत्य विधाच्या वतीने शहराच्या इतर उपनगरामध्ये देखील संस्कार भारतीचे कार्य पोहचावे आणि त्यांचसोबत शास्त्रीय नृत्य संवर्धन करणाऱ्या संस्था आणि नृत्य शिकणाऱ्या नवोदित कलासाधकांना, कला रसिकांना संस्कार भारतीशी जोडण्याचा उद्देश असून दर महिन्याला होणाऱ्या मासिक सभामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नृत्य विधा संयोजिका वरदा वैश्यपायन यांनी केले.

नटेश्वर नृत्यकला मंदिर ह्या संस्थेच्या संचालिका गुरू शिल्पा भोमे ह्यांच्या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले. त्यात त्यांनी देवी स्तुति, ताल त्रिताल, तराणा, ठुमरी तसेच गीताउपदेश व गरज गरज आज मेघा ह्या उपशास्त्रीय गीतांवरही नृत्य सादरीकरण केले. 

तसेच गुरू श्रुती परांजपे व त्यांच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम् ह्या शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये गणेश वंदना, नवरस, नटेश कौतुकम, मिश्रचापू अलारिपू, नक्षत्र राशी ह्या रचना फार उत्कृष्टरीत्या सादर केल्या. एकूण २२ नृत्य कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली.

स्थानिक प्रेक्षकांचा ह्या कथ्थक आणि भरतनाट्यम् शास्त्रीय नृत्य प्रकारास भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संस्कार भारती पश्चिम प्रांताच्या उपाध्यक्ष सुवर्णा बाग, पिंपरी चिंचवड समिती अध्यक्ष सचिन काळभोर, नृत्य विधा प्रमुख वरदा वैशंपायन, सहविधा प्रमुख स्वप्ना रत्नाळीकर कुर्डुकर, सुजा दिनकर ह्या उपस्थित होत्या. या उपक्रमाला मोरवाडी परिसरातील रसिक प्रेक्षकांची चांगली उपस्थिती होती.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय