Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसंगिता जोगदंड याची विशेष कार्यकारी आधिकारी म्हणून नियुक्ती

संगिता जोगदंड याची विशेष कार्यकारी आधिकारी म्हणून नियुक्ती

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : नवी सांगवीतील महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त संगिता जोगदंड यांना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी विशेष कार्यकारी आधिकारी चे नियुक्ती पत्र दिले. 

यावेळी संगीता जोगदंड म्हणाल्या कि सामाजिक काम करत असताना सामाजिक क्षेत्रात मान मिळतोचच असे नाही. वेळप्रसंगी अपमानही सहन करावा लागतो. पण आपण आपले सामाजिक  कार्य कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता चालू ठेवणे हेच आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे. 

आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याच उदात्य भावनेतून आपण काम केले पाहिजे याच निस्वार्थीपणे केलेल्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांने आम्हा दोघांना पती-पत्नी गुणवंत कामगार पुरस्कार देऊन राज्यातील दुसरे तर पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमधील पहिले पती-पत्नी म्हणून गुणवंत कामगार पुरस्कारार्थी म्हणून  होण्याचा मान मिळाला. याचेच फलित म्हणून आज मला विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले, एकाच कुटुंबातील पती-पत्नी म्हणून विशेष कार्यकारी आधिकारी पद मिळवणारे शहरातील  पहीले पती पत्नी गुणवंत कामगार ठरलो आहोत याचा शहराला व आम्हाला ही सार्थ आभिमान वाटतो, यापुढे आम्ही आधिक जबाबदारीने सामाजिक काम करू राहू असे संगिता जोगदंड यांनी यावेळी म्हटले आहे.

काम करत आसताना मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई चव्हाण, सचिव राजेश हजारे, सहसचिव संजय गोळे,पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे,माझे पती व गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, गृह शाखा तहसीलदार धनंजय जाधव याचे हि सहकार्य मिळाले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय