Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : 'सौंदर्यवती स्पर्धा' मुळे सामान्य महिलांचा आत्मविश्वास वाढला - प्रीती बोंडे

PCMC : ‘सौंदर्यवती स्पर्धा’ मुळे सामान्य महिलांचा आत्मविश्वास वाढला – प्रीती बोंडे

लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अक्टिव्हचा शहरातील प्रथम उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रयत्न करताना, स्वतःला सिद्ध करण्याची एक ऊत्तम संधी आयोजक लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अक्टिव्हच्या अध्यक्षा प्रीती बोंडे यांनी सर्व महिलांना उपलब्ध करून दिली. Fashion Show हा सर्व महिलांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्य महिला सहभागी होऊन सिद्ध करू शकतात, हा आत्मविश्वास महिलांना या स्पर्धेमुळे मिळाला आहे. pcmc news

पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच लायन्स क्लब पिंपळे सौदागर ॲक्टिव्हच्या वतीने ग.दि. माडगूळकर प्रेक्षागृह आकुर्डी येथे (दि.१५) विद्यार्थिनी, युवती, विवाहित महिला यांचेसाठी मिस (MS) आणि मिसेस (MRS) यांच्यासाठी सौंदर्यवती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पिंपरी चिंचवड, अमरावती परतवाडा, नागपूर आदी शहरातून विविध स्तरातील ४४ मुली आणि महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.pcmc news

या स्पर्धेच्या प्रायोजक आणि लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ॲक्टिव्हच्या अध्यक्षा प्रीती बोंडे यांनी शहरात प्रथमच आयोजित केलेल्या सौंदर्यवती स्पर्धे बद्दल माहिती देताना सांगितले की,

पिंपरी चिंचवड शहरात सौंदर्य स्पर्धा प्रथमच होत आहेत. आजच्या कार्पोरेट मार्केटिंगच्या युगात महिलांची जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून निवड केली जाते.
मात्र वेशभूषा,केशभूषा, शरीरसौष्ठव या पलीकडे जाऊन सामान्य घरातील मुली आणि विवाहित मातांना सौंदर्यवती स्पर्धेमध्ये व्यक्त होण्याची संधी आम्ही मिळवून दिली.


त्यामुळे अंगणवाडी सेविका, महविद्यालयीन मुली, स्वयंरोजगार, व्यवसाय, उद्योगातील कर्मचारी महिलांनी विविध वस्त्र अलंकार परिधान करून प्रेक्षागृहाच्या रंगमंचावर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे सादरीकरण (presentetion) केले. यावेळी जजेसच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना महिलांच्या बुद्धिमत्तेचा कस लागला आहे. असे प्रीती बोंडे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले.


या स्पर्धेच्या जजेस सविता एस के, नीलिमा डायस, दीप्ती शहा यांनी विजेत्यांची नावे घोषित केली.

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

मिस(MS) सौंदर्यवती
1) वैष्णवी पाटील-विनर
2) भूमीच्या तुरखडे 1st Runner up
3) धनश्री धुमाळ 2 nd Runner up

मिसेस (MRS) सौंदर्यवती

1) सीना मोदी.. विनर
2) मृणाली बोरकर 1st Runner up
3) प्रतीक्षा रंगारी 2 nd Runner up

तसेच सहभागी मुली महिलांना विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. प्रत्येक सहभागी महिला मुलींना विशेष सन्मान चिन्ह देण्यात आले.


या सर्व स्पर्धकांचे कौतुक करताना प्रमुख पाहुणे लायन विजय भंडारी यांनी सांगितले की,
—–शहरातील प्रथमच आयोजित केलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, आजकाल स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाला रंग, वय हा निकष राहिलेला नाही, स्वतःचे एक व्यक्तिमत्व म्हणून सिद्ध करण्यासाठी सौदर्य स्पर्धा हे एक उत्तम व्यासपीठ आम्ही सुरू केले आहे. या स्पर्धेसाठी जमा झालेला निधी आम्ही ग्रामीण भागातील गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहोत.

या स्पर्धेच्या कार्यक्रमा दरम्यान इंटरव्हल मध्ये लायन MJF अनिल झोपे, लायन अर्चना सपकाळ, नम्रता सारडा यांनी सुमधुर गीतांचे सादरीकरण केले. प्रेक्षागृहात २५० हून जास्त लोकांनी या स्पर्धेला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. pcmc news


या स्पर्धेच्या शोचे दिग्दर्शन (direction) स्नेहा प्रल्हादके यांनी केले, शोचे स्टॉपर गीतांजली खैरनार, ओजश्री कोंढारी यांनी केले.

सौंदर्यवती स्पर्धेसाठी लायन विजय भंडारी, लायन सुनील जाधव, श्रेयस दीक्षित, लायन विजय सारडा, लायन दीपक सोनार, जयंत बोंडे, लायन राजेश अग्रवाल, लायन् वसंत कोकणे, लायन राजेंद्र गोयल, लायन अर्चना सपकाळ, लायन सफला ओसवाल, लायन ज्योति क्षीरसागर, लायन प्रियंका परमार लायन, शिरीष हिवाळे, लायन ऋषिकेश देवरे, लायन हॉटेल पंजाब रसोई,लायन MJF राज मुछाल गिफ्ट स्पॉन्सर लायन कमल मलकानी लायन रवींद्र गोलार, लायन दीपक लोया यांनी आर्थिक योगदान व स्मृति चिन्हे लायन्स क्लब साठी प्रायोजित केली होती, त्या सर्वांचे आभार प्रीती बोंडे यांनी समारोप करताना व्यक्त केले.


या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, शिवसेना नेते एकनाथ पवार, संतोष बारणे (चेअरमन महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग असोसिएशन) डायरेक्टर सिल्वर ग्रुप, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनरीक्षक डी एस मुंडकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. pcmc news

तसेच माजी नगरसेविका अश्विनी जाधव, माजी नगरसेविका सारिका बोराडे, रूपाली आल्हाट परशुराम आल्हाट, रविंद्र जांभुळकर, शाम खंडेलवाल, सोनम जांभुळकर, ललिता पवार सह सेक्रेटरी लायन् बालाजी जगताप, ट्रेझरर लायन धनंजय माने, एमजेएफ लायन सुनील जाधव, लायन जयंत बोंडे, लायन ऋषिकेश देवरे, लायन जितेंद्र हिंगणे, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी एल जोशी, MJF लायन विजय सारडा, लायन MJF श्रेयस दिक्षित, लायन् दीपा जाधव, लायन झोन चेअर पर्सन दत्तात्रय सपकाळ, लायन अर्चना सपकाळ, लायन प्रीती दीक्षित, श्रुती बोंडे तसेच क्लब मधील सर्व लायन्स सभासद नॉन लायन्स मान्यवर अतिथी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय