नाच गं घुमा’ या चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती
पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड (pcmc) विद्यापीठात (PCU) ‘अनंतम २०२४’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. pcmc news
पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मायरा वैकुल, अलाहाबाद येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. मुकुल सुताने आदी उपस्थित होते. pcmc news
‘अनंतम -२०२४’ मध्ये कुलदीप सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्तथरारक ‘बाईक शो’ प्रस्तुत केला तसेच प्रसिद्ध बॅंड ‘एमएच ४३’ यांच्या संगीताच्या तालावर तरुणाई थिरकली, तर फॅशन शोला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अंजू बाला यांनी केले.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !