Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेची "मशाल यात्रा"

PCMC : संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेची “मशाल यात्रा”

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीने शहरात “मशाल यात्रा” काढण्यात आली. (PCMC)

युवासेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्या सोबत हाती मशाल घेऊन असंख्य युवासैनिक या यात्रेत सहभागी झाले. उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचे मुख्य सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते मशाल पेटवून या मशाल यात्रेची सुरुवात रहाटणीतून करण्यात आली. रहाटणी परिसरानंतर काळेवाडी, अमरदीप कॉलनी, पिंपरी बाराजपेठ, डीलक्स चौक, पिंपरीगाव, पिंपरी सौदागर यासह विविध भागातून मशाल यात्रा काढून प्रचार करण्यात आला. pcmc news

या मशाल यात्रेत “जय भवानी, जय शिवाजी”चा जयघोष करीत हातात मशाली घेऊन युवा सैनिांनी मावळ लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी फक्त मशाल हेच चिन्ह लक्षात ठेवण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. pcmc news

वरुण सरदेसाई यांच्यासोबत या यात्रेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, युवा सेनेचे शहर युवा अधिकारी चेतन पवार, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य योगेश निमसे, गुलाब गरुड, दस्तगीर मणियार यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सैनेचे पदाधिकारी, युवासैनिक या यात्रेत सहभागी झाले होते. pcmc news

या यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना गाडण्याचा संदेश दिला आहे. तो संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. गद्दारी करणा-यांना आणि उध्दव ठाकरे यांना त्रास देणा-यांना या निवडणुकीत आपल्याला धडा शिकवायचा आहे. मतदारसंघात मशाल पेटवून संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करायचे आहे. त्यासाठी 13 मे पर्यंत कोणीही गाफील राहू नका, असे आवाहन वरुण सरदेसाई यांनी युवासैनिकांना केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय