Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शिरुरमध्ये भोसरी मतदारसंघ महायुतीसाठी ‘किंगमेकर’

PCMC : शिरुरमध्ये भोसरी मतदारसंघ महायुतीसाठी ‘किंगमेकर’

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी १ लाख मातांची आघाडी या मतदार संघातून राहील आणि शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landage ) यांनी व्यक्त केला आहे. पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रातील महाराष्ट्रातील विविध जिल्हातून शिक्षणासाठी आलेल्या मुलांना स्नेहभोजन देऊन अक्षय चव्हाण यांनी त्यांचा आनंद द्धिगुणीत केला. pcmc

शिरुर लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारार्थ भोसरी गावठाण येथे दौरा करण्यात आला.

यावेळी पदयात्रेची सुरूवात भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर श्री हनुमान मंदिर येथे भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत आढळराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, भोसरी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसरात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. PCMC NEWS

यावेळी आमदार महेश लांडगे यांच्यासह महायुती व घटक पक्षांचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील महिला-माता- भगिनींनी उमेदवार आढळराव पाटील यांचे ठिकठिकाणी औक्षण केले.

भोसरी विधानसभा मतदार संघातून १ लाख मतांची आघाडी देण्याचा निर्धार श्री. भैरवनाथ मंदिरात करण्यात आला. तसेच, ‘‘बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या…’’ असे आवाहन यानिमित्ताने मतदार, नागरिकांना करण्यात आले. pcmc news

प्रतिक्रिया :

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात झालेला विकास, शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, कल्याणकारी योजना आणि देशाची जागतिक पातळीवर उंचावलेली प्रतिक्षा यामुळे महायुतीला निश्चितपणे मोठा जनाधार आहे. भोसरी मतदार संघातील सुमारे ५ लाख ३५ हजाराहून अधिक असलेले मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय