Friday, May 3, 2024
Homeजिल्हाBirsa Fighters: काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नाही बिरसा फायटर्सचे स्पष्टीकरण

Birsa Fighters: काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नाही बिरसा फायटर्सचे स्पष्टीकरण

Birsa Fighters: बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने तळोदा येथे बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांना पाठिंबा द्यायचे ठरले आहे, असा मेसेज बिरसा आर्मीचे अक्कलकुव्याचे उपाध्यक्षपंकज पाडवी यांनी ब-याच ग्रूपवर दुपारी फाॅरवर्ड केली. त्यानंतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तीच पोस्ट ग्रूपवर फाॅरवर्ड करण्यात आली. परंतु पंकज पाडवी हा १४ तारखेला तयार करण्यात आलेल्या नवीन संघटनेतला फूटीर माणूस असल्याचे बिरसा फायटर्सचे (Birsa Fighters) अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी स्पष्ट केले आहे.

नंदूरबार लोकसभा क्षेत्रात बिरसा फायटर्स (Birsa Fighters) संघटनेकडून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढणार आहे, हे घोषित झाल्यानंतर मला ५८ सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाल्याचे सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले.

तसेच, पुढे पावरा म्हणाले, मला मिळता पाठिंबा पाहुन काँग्रेस पक्षांच्या लोकांची, काँग्रेस उमेदवाराची पायाखालची माती घसरली. त्यांना आपला पराभव १०० टक्के होणार हे दिसत असल्यामुळे त्यांनी आमच्या बिरसा फायटर्स संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला, अशीही टीका त्यांनी केली.

आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आमीश दाखवून माझी उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव सुरू केला. मी उमेदवारी मागे घेत नाही हे बघून राजेंद्र पाडवी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला व १४ एप्रिल ला बिरसा आर्मी नावाची संघटना घोषित केल्याचे दाखवून कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या लोकांना हाताशी धरून बिरसा फायटर्सचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय अशी खोटी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय