Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

PCMC : मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मावळ लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे उमेदवार आहेत. MAVAL LOK SABHA PCMC

मागील दहा वर्षांपासून मावळचे ते खासदार आहेत. 2014, 2019 मध्ये ते मोठ्या मताधिक्याने मावळमधून निवडून गेले. PCMC

श्रीरंग बारणे : राजकीय कारकीर्द 30 वर्षाची

1) 1997 : पिंपरी-चिंचवड PCMC महापालिकेत नगरसेवक म्हणून निवड
2) 1999 : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड 
3) 2002 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा नगरसेवक
4) 2002-05 : विरोधी पक्षनेते-पिंपरी चिंचवड महापालिका PCMC व सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती
5) 2007 व 2012 महापालिकेत पुन्हा नगरसेवकपदी निवड
6) 2012 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड 

7) 2014 : 16 व्या लोकसभेसाठी निवडून आले.
8) सप्टें.2014 : सदस्य, संरक्षणविषयक स्थायी समिती सदस्य, रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणीवरील सल्लागार समिती सदस्य, राजभाषेवरील संसदीय समिती 
9) 2015 : 16 व्या लोकसभेच्या पहिल्या चार सत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘संसद रत्न’ पुरस्काराने सन्मानित.
10) 2016 : 16 व्या लोकसभेच्या ( 7 व्या अधिवेशनापर्यंत) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांसाठी संसद रत्न पुरस्कार
11) 2019 : 17 व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले.
12) 13 सप्टें. 2019 : सदस्य – अर्थविषयक स्थायी समिती, सदस्य – पर्यटन संस्कृतीविषयक सल्लागार समिती, सदस्य – राजभाषा विषयक संसदीय समिती (प्रथम उपसमिती) आणि सदस्य:- आलेख आणि साक्ष्य समिती 
13) 2020 16 व्या लोकसभेत सातत्यपूर्ण गुणात्मक कामगिरीसाठी ‘संसद महारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित. हा पुरस्कार पाच वर्षांतून एकदा दिला जातो. PCMC NEWS

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय