Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : धर्मवीर संभाजीराजे मंच, शाहूनगर यांचे तर्फे शिवजयंती महोत्सव

PCMC : धर्मवीर संभाजीराजे मंच, शाहूनगर यांचे तर्फे शिवजयंती महोत्सव

पिंपरी चिंचवड : धर्मवीर संभाजीराजे मंच,शाहूनगर,चिंचवड (PCMC) यांचे तर्फे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. दि.२८ मार्च २०२४ सकाळी साडेदहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रा. राजेंद्र गावटे यांनी व्याख्यान दिले.

सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक गीते आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील तीन प्रसंग सादर करण्यात आले.


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख ऍड.सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू , युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी महापौर मंगला कदम, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया चांदगुडे, माजी नगरसेवक केशव घोळवे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे संस्थापक संजय पाटील, अध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव राजेंद्र भागवत, खजिनदार अनिल पाटील, महेश मेस्त्री, गोपीचंद जगताप, महेश माने, विशाल देसले, तानाजी पवार, पी एम पाटील, हर्षल मुळूक, अक्षय पाटील यांनी केले. PCMC NEWS

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय