Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमेघा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुखपदी निवड

मेघा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुखपदी निवड

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आणि पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मेघा पवार यांची रोजगार व स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुख पदी आज नियुक्ती करण्यात आली. (Megha Pawar has been selected as the State Head of the Nationalist Congress Party)

या सेलच्या माध्यमातून बेरोजगारी महिला बचतगट, युवक, महिला यांच्यासाठी अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. सेलच्या माध्यमातून गृह उद्योग निर्मिती, व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन, शासकीय योजनां लोकांपर्यंत पोहोचवणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, बाजारपेठेची उपलब्धता तसेच बचत गटाचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर काम करण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक सक्षमीकरणाच्या अनेक संधी निर्माण होतील तसेच पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन, असा विश्वास मेघा पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केला आहे. 

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (पाटील), दिलीप पोटफोडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 342 जागांवर भरती; पदवीधरांना संधी!‌‌

Nationalist Congress Party
Nationalist Congress Party
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय