Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यMBBS College Increasing : राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये "इतक्या" हजारांची वाढ होणार, 12...

MBBS College Increasing : राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये “इतक्या” हजारांची वाढ होणार, 12 वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव

MBBS College Increasing : राज्यातील १२ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) मान्यतेकरिता प्रस्ताव पाठवले आहेत. त्यांना मान्यता मिळाल्यास राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये एक ते दीड हजारांची भर पडण्याची शक्यता आहे.मराठा आरक्षणामुळे (एसईबीसी) खुल्या वर्गातील १० टक्के जागा कमी झाल्या होत्या. केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास खुल्या गटातील विद्यार्थ्यांना या वाढीव जागांमुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.

एनएमसीकडे देशभरातून ११२ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव आले आहेत. सर्वाधिक अर्ज उत्तर प्रदेशमधून आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातून अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालय आणि त्याला संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय या धोरणाला अनुसरून जास्तीत जास्त महाविद्यालयांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.

विदर्भ मराठवाडा विभागाला झुकते माप


अंबरनाथ, पालघर, हिंगोली, वर्धा, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, जालना, वाशिम आणि अमरावती येथे प्रत्येकी १०० जागांची क्षमता असलेली नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित महाविद्यालयांमधील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एमपीएससीमार्फत ही १,१०० पदे भरण्यात येणार आहेत. देशभरातून ११२ सरकारी आणि ५८ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता परवानगी मागितली आहे. राज्यातून १० सरकारी महाविद्यालये आणि दोन डीम्ड विद्यापीठांनी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत. यात दक्षिण मुंबईतील सेंट जॉर्ज कॉलेजचाही समावेश आहे.(MBBS College Increasing)

विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

दरवर्षी हजारो मुले भारतामध्ये एमबीबीएस च्या जागा कमी असल्याने परदेशी शिकण्यासाठी जातात. रशिया ,युक्रेन, इंग्लंड,जर्मनी,पोलंड, ऑस्ट्रेलिया अशा विविध भागांमध्ये मुलं शिकण्यासाठी जात असतात. अशा मुलांना सीईटीमध्ये आणि नीट च्या परीक्षेमध्ये स्कोर कमी आलेला असतो. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारा महाविद्यालय मंजूर झाल्यास एक ते दीड हजार जागा वाढवून मिळतील. खासगी महाविद्यालयांचे शुल्क न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे निश्चितपणे दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण सरकारने पुरेशा पायाभूत सुविधांशिवाय नवीन महाविद्यालये सुरू करण्याची घाई करू नये, असेही त्या म्हणाल्या.(MBBS College Increasing)

whatsapp link

हे ही वाचा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

संबंधित लेख

लोकप्रिय