Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याMalshej Ghat : महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा...

Malshej Ghat : महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

Malshej Ghat : महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध महामार्ग तयार केले जात आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात कल्याण ते लातूर दरम्यान एक नवीन मार्ग विकसित होणार आहे.

या महामार्गामुळे कोकण आणि मराठवाडा हे दोन महत्त्वाचे विभाग परस्परांना जोडले जाणार आहेत. सध्या स्थितीला कल्याण ते लातूर हा 450 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 10 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. कल्याण ते लातूर हे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी नवीन महामार्ग बांधण्याची संकल्पना मांडली आहे.

हा मार्ग कल्याण येथून सुरू होईल. पुढे हा मार्ग माळशेज घाटात (Malshej Ghat) प्रवेश करेल. माळशेज घाटात या प्रकल्प अंतर्गत तब्बल 8 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाईल. या बोगद्याने पुढे अहमदनगरला जाता येईल.

मग तेथून पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत हा महामार्ग संपणार आहे. या मार्गामुळे कल्याण ते लातूर हा प्रवास 4 तासात पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा 6 तासांचा कालावधी वाचणार आहे.

या महामार्गासाठी 50 हजार कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव आता सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय