Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणBullock in the car बापरे ! नंदुरबार मध्ये उधळलेला बैल घुसला थेट...

Bullock in the car बापरे ! नंदुरबार मध्ये उधळलेला बैल घुसला थेट कार मध्ये

नंदूरबार : कृषीप्रधान संस्कृतीमध्ये बैल हा पूजक मानला जातो. बैलपोळा सणा दिवशी आपण बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करतो कारण मशागतीची तसेच शेतातील सर्वच काम ही बैलामार्फत केली जातात. त्यामुळे आपल्याकडे बैलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरामध्ये मात्र गाई, बैल मोकाट हिंडत असतात. भाजी मंडई मधील शिल्लक राहिलेला गाडी कचरा खाऊन आपली गुजरान करत असतात. अशातच अनेकदा बैलांमध्ये भांडणे होऊन ती सर्वसामान्य माणसाच्या जीवावर उठतात. इंटरनेटवर अशा व्हिडिओ व्हायरल होतात अशातच नंदुरबार येथे विचित्र घटना घडली. (Bullock in the car)

दामळदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील व कुटुंबीय शहाद्याहून कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे निघाले होते. टुकी-जवखेडा गावालगत प्रवेश केला असता, समोरून गुरांचा कळप येत असल्याचे पाहून पाटील यांनी वाहन रस्त्याचा बाजूला थांबवलं. (Bullock in the car) कळप हळूहळू येत असताना समोरून त्यातून एक बैल अचानक उधळला आणि धावत जाऊन तो थेट कारवर (क्रमांक जे.जी.एम. ५१५४) चढला, शिंगाने पुढील काच फोडून थेट कारमध्येच घुसला; परंतु प्रसंगावधान राखून बैल येत असल्याचे लक्षात घेताच कारमधील पाचही जणांनी लागलीच बाहेर उड्या मारल्या.

बैलाचे शीर व शरीराचा अर्धा भाग कारमध्ये, तर धड व मागील दोन पाय कारच्या बाहेर अशी स्थिती होती. महत्प्रयासाने बैलाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जीवितहानी टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. समोरून बैल उधळला असल्याचे लक्षात येताच कारमधील सर्वांना लागलीच बाहेर पडण्याचे सांगितले.(Bullock in the car) क्षणाचाही विलंब न करता चारही दरवाजे उघडून आम्ही बाहेर पडलो. काही क्षणात बैलाने पुढील काचेवर धडक देत आत घुसला. कारचे नुकसान झाले; पण कुणी जखमी झाले नाही त्यातच समाधान असल्याचे डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

whatsapp link

हे ही वाचा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय