Tuesday, May 7, 2024
Homeजिल्हाDBT scheme: डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करण्यास भाग पाडणार - सुशिलकुमार पावरा

DBT scheme: डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करण्यास भाग पाडणार – सुशिलकुमार पावरा

DBT scheme : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुशिलकुमार पावरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना मागील सहा वर्षापासून त्रासदायक ठरलेली आणि शिक्षणापासून वंचित ठेवणारी डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शासनाला भाग पाडणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (DBT scheme)

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा डीबीटीचा विषय मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी व प्रमुख मुद्दा असतांनादेखील अजूनपर्यंत भाजप असो वा काँग्रेस यांपैकी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी डीबीटीचा प्रश्न सोडवलेला नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून उघडपणे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यातही जिल्ह्यातूनच ॲड.के.सी पाडवी आणि डॉ.विजयकुमार गावित या दोन आमदारांना आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मिळूनही ते हा “डीबीटी” प्रश्न सोडवू शकलेले नसल्याची टीका अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी केली.

डीबीटी धोरण लागू करणारे भाजप आणि ते धोरण रद्द न करता कायम ठेवणारी काँग्रेस या दोघांबद्दलही नाराजी व्यक्त होण्यासोबतच यांचा एकही उमेदवार डीबीटीचा विषय सोडवण्याचे आश्वासन देतांना दिसत नसल्याची चर्चा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये सुरू होती. पण आता बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी आपण निवडून आल्यास डीबीटी योजना नेहमीसाठी बंद करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय