Tuesday, May 7, 2024
HomeआंबेगावManchar : आदिवासींना बेघर करणे अन्यायकारक – किसान सभा

Manchar : आदिवासींना बेघर करणे अन्यायकारक – किसान सभा

Manchar : आदिवासींना बेघर करणे अन्यायकारक असल्याचे अखिल भारतीय किसान किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीने म्हटले आहे. आज किसान सभेचे शिष्टमंडळ यांनी मंचर येथे प्रांत कार्यालयासमोर आंदोलनकर्ते व या आंदोलनाचे नेतृव करणारे नेते, कार्यकर्ते यांची भेट घेतली. व हा सर्व प्रश्न समजून घेत त्यांच्या या लढ्याला पूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले. Manchar news

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील काही गावातील आदिवासी कुटुंबाचे वनजमिनीवरील त्यांचे वास्तव्य, वनविभागाने नुकतेच काढून टाकले आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबं आज बेघर झाली आहेत. या बेघर झालेल्या आदिवासी महिला-पुरुषांनी, प्रांत कार्यालय मंचर येथे उपोषण सुरु केलेले आहे.

प्रांत कार्यालय येथे शेकडो आदिवासी महिला -पुरुष व लहान बालके, वृद्ध हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत.सुमारे 10 दिवस त्यांचा मुक्काम मंचर प्रांत कार्यालय येथेच आहे. या उपोषणास किसान सभा, पुणे जिल्हा समितीने या अगोदरच पाठींबा देऊन आदिवासी वरील झालेल्या अन्यायाची तात्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केलेली होती.

आदिवासी समुदायाला बेघर करणाऱ्या राज्य शासनाचा व वन विभागाचा किसान सभेच्या वतीने तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, सचिव विश्वनाथ निगळे, जिल्हा समितीचे पदाधिकारी राजू घोडे, आमोद गरुड, विकास भाईक, राजू शेळके इ.उपस्थित होते.

whatsapp link

हे ही वाचा :

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय