Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अण्णा भाऊ साठे लिखित माझा रशियाचा प्रवास :एक आकलन' या...

PCMC : अण्णा भाऊ साठे लिखित माझा रशियाचा प्रवास :एक आकलन’ या संशोधानात्मक ग्रंथास पुरस्कार

पिंपरी चिंचवड : डॉ.धनंजय भिसे यांच्या ‘अण्णा भाऊ साठे लिखित माझा रशियाचा प्रवास :एक आकलन’ या संशोधानात्मक ग्रंथास चैत्रपालवी काव्य मंच व कवी चंद्रकांत जोगदंड ग्रुप यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै गंगाधर श्रावण आबक स्मृति पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. (PCMC)

रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.कॉलेज हडपसर येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. धनंजय भिसे हे नामवंत वक्ते,सूत्रसंचालक आणि सामाजिक व साहित्यिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. (PCMC)

गेली अनेक वर्षापासून साहित्य चळवळ आणि सामाजिक चळवळीमध्ये अनेक वर्षापासून सक्रिय सहभाग आहे. अनेकविध पुस्तकांचे विविध वाङ्मयप्रकारांतून त्यांनी लेखन केले आहे.

सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य चळवळीत महत्वाचे योगदान त्यांनी दिले आहे. चैत्रपालवी काव्य मंचच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथ म्हणून’अण्णा भाऊ साठे लिखित माझा रशियाचा प्रवास :एक आकलन’ या त्यांच्या संशोधानात्मक ग्रंथास 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस व ज्येष्ठ कथाकार बबन पोतदार यांच्या शुभहस्ते ‘ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै गंगाधर श्रावण आबक स्मृति पुरस्काराने’पुणे येथे रविवार दि. 5 मे 2024 रोजी समारंभ पुर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी ग्रंथाच्या प्रकाशिका रुपाली अवचरे, चैत्रपालवी संस्थेचे प्रमुख चंद्रकांत जोगदंड,प्रतिमा काळे, तानाजी शिंदे,व्यंकटराव वाघमोडे,सूर्यकांत तिवडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवि रानकवी यांनी केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय