Sunday, April 28, 2024
Homeजुन्नरJunnar : थेट रुग्णालयात शिरला बिबट्या; हल्ल्यात वनरक्षक जखमी

Junnar : थेट रुग्णालयात शिरला बिबट्या; हल्ल्यात वनरक्षक जखमी

Junnar : आळेफाटा बस स्थानकाजवळ असलेल्या खाजगी हॉस्बिपिटलमध्ये बिबट्या घुसल्याने परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली. पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाटा (ता.जुन्नर) चौकाजवळ मंगळवार (दि.26) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने वेळ रात्री साडे दहाची होती आणि रुग्णाच्या वॉर्डचं दार बंद होतं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. Junnar News

या घटनेची तातडीने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. बिबट्याच्या हल्यात एक दुचाकीस्वार आणि एक वनसंरक्षक जखमी झाला. बिबट्याने इमारतीतून लगतच्या पत्र्यावर झेप घेतली अन तिथून शेजारच्या शेतात पळ काढला. तब्बल तासभर चाललेला हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सविस्तर वृत्त असे की, आळेफाटा (ता. जुन्नर) चौकापासून जवळच असलेल्या वस्तीतून पुणे नाशिक महामार्ग ओलांडताना बिबट्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. यानंतर हा बिबट्या थेट जवळच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या रुग्णालयात घुसला. रुग्णालयाचे दरवाजे बंद असल्याने तसेच नागरिकांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या शेजारी असलेल्या पांडुरंग नरवडे यांच्या पांडुरंग कृपा या बिल्डिंगमध्ये हा बिबट्या घुसला. यावेळी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

त्यांनी दरवाजे लावून घेतले. त्यानंतर हा बिबट्या जिन्याने चढून टेरस वर जाऊन बसला. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. त्यांनी वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनविभागाचे वनरक्षक कैलास भालेराव घटनास्थळी आले. त्यानंतर काही वेळाने रेस्क्यू टीम आली. दुसऱ्या बाजूने बिल्डिंग वर चढून त्यांनी बिबट्यास खाली आणले. मात्र बिबट्या खाली येत असताना घरच्या पत्र्याच्या शेडवर लपून बसला. जवळपास एक तासानंतर बिबट्या बिल्डिंगमधून बाहेर आला व त्याने आळेफाटा चौकातल असलेल्या वस्तीतुन पुढे धुम ठोकली.

दरम्यान, बिल्डिंगमध्ये घुसलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यासाठी गेलेल्या रेस्कु टीममधील आळे वनपरिक्षेत्रेचे वनरक्षक कैलास भालेराव यांचेवर बिल्डिंगमधून बाहेर पडणा-या बिबट्याने हल्ला केला यामध्ये त्यांचे हाताला जखम झाली. मात्र प्रसंगावधान राखल्याने व इतर रेस्कु टीममधील सदस्यांनी मदत केल्याने ते या हल्ल्यात थोडक्यात बचावले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय