Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : क्वीन्स टाऊन सोसायटीतर्फे कॉर्फबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सन्मान

PCMC : क्वीन्स टाऊन सोसायटीतर्फे कॉर्फबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सन्मान

स्निग्धा सातव आणि कृष्णा सातव क्वीन्स टाऊन सोसायटीचे रहिवाशी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: आग्रा येथे संपन्न झालेल्या १९ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर कॉर्फबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीच्या वतीने संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी संघातील रिया बोरा ( कर्णधार), युविका कोल्हे, अन्विता बोरसे, स्निग्धा सातव, प्राची संघवी, मुले- कृष्णा सातव, आर्यण शिंगटे, प्रद्युम्न नायर, आरिझ दानवडे या खेळाडूंचा सत्कारामध्ये समावेश आहे. PCMC NEWS

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुजित पाटील, सचिव बबन भोसले, सुरेश गारगोटे,ज्येष्ठ दंतवैद्य डॉ.माऊली फरांदे, माजी नगरसेविका भारती फरांदे, ॲड कुंडलिक गावडे, ॲड सोपान माने, उद्योजक भास्कर गावडे, प्रदीप दिवटे, बाबासाहेब माने, मल्लिनाथ कलशेट्टी, कार्यक्रमाचे समन्वयक रमेश सातव, प्रशिक्षक सचिन ववले, अविनाश अहिरशिंगे आणि सोसायटीतील सर्व संचालक मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते PCMC NEWS

यावेळी क्रीडा मानसिकता विषयक (लंडन) पदवीप्राप्त अदिती गारगोटे म्हणाली कि,खेळाडूंनी खेळताना आपलं डोकं शांत ठेवून खेळाकडे अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे.सदरील खेळाडू शिकत असलेल्या सेंट ऊर्सूला हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर ग्रेसी यांनी अभिनंदन केले.यावेळी डॉ फरांदे यांनी शुभेच्छा दिल्या.

सोसायटीचे सुजित पाटील यांनी त्यांच्या मनोगतांमध्ये सोसायटीची क्लब हाऊस आणि सोसायटीमधील मुलांना खेळाच्या बाबतीमध्ये जे जे काही सहकार्य सोसायटीच्या वतीने शक्य ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सोसायटीतून दरवर्षी असे नवनवीन खेळाडू घडावेत. अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गारगोटे यांनी केले. आभार प्रदर्शन उद्योजक रमेश सातव यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय