बैरुत : इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख कमांडर नसरल्लाह व्यतिरिक्त हिजबुल्लाहचे इतर अनेक कमांडर मारले गेले आहेत. याची खात्री अधिकृतपणे माहिती इस्रायली डिफेन्स फोर्सने ( IDF) आणि जगभरच्या प्रसार माध्यमानी दिली आहे. (Israel strikes)
बैरुत : इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुत येथे केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख कमांडर नसरल्लाह तसेच दक्षिण आघाडीचा कमांडर म्हणून ओळखला जाणारा अली कराके आणि हिजबुल्लाहचे इतर अनेक कमांडर ठार झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे.
हिजबुल्लाह या दहशतवादी सशत्र संघटनेला आणि इराणला हा मोठा धक्का असून 2006 च्या लेबनॉन आणि इस्रायलच्या लढाई नंतर हा योजना बद्ध रीतीने इस्रायलने केलेला हा मोठा हल्ला आहे.
गाझा पट्टीतील एक वर्ष सुरू असलेली लढाई नंतर आता लेबनॉन वर इस्रायल आता हमासचे कंबरडे मोडल्यानंतर लेबनॉन मधील हिजबुल्लाहचे सर्व तळ नष्ट करण्यासाठी आता व्यापक युद्ध लढत आहे. इकडे हिजबुल्लाहचे क्षेपणास्त्र आणि रॉकेट हल्ले इस्रायलवर सुरू आहेत. (Israel strikes)
अमेरिका, फ्रान्स आणि संयुक्त राष्ट्रसंघाने युद्ध विराम करण्याचे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी फेटाळून लावले आहेत. या नव्या युद्धामुळे जगभर हे युद्ध मध्य पूर्वेत पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक तेलाच्या किमती आणि व्यापार यावर या नव्या युद्धामुळे जगाच्या अर्थ व्यवस्था बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले