Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल 27 सप्टेंबर रोजी जाहीर झाला असून, युवासेनेने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 10 पैकी 10 जागांवर युवासेनेने बाजी मारत आपल्या वर्चस्वाची पुनरावृत्ती केली आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.
या निकालानंतर युवासेनेने पुन्हा एकदा विद्यापीठात आपला दबदबा कायम राखला आहे. युवा सेनेने 10 पैकी 9 जागा जिंकल्यानंतर दहावी जागा आपल्या वाट्याला येणार, याबाबत विरोधकांना आशा होती. पण, पदवीधर मतदारांनी युवासेनेच्या बाजूनेच दहाव्या जागेचाही कौल दिला.
युवासेनेने निवडणुकीत अभाविपचा धुव्वा उडवला असून, दहावी जागाही युवासेनेच्या किसन सावंत यांनी जिंकली. त्यामुळे विरोधकांची आशा पूर्णपणे फोल ठरली. 2018 मध्ये देखील युवासेनेने सर्व 10 जागांवर विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा युवासेनानेच बाजी मारली आहे. (Mumbai University Senate Election 2024)
विजयी उमेदवारांची यादी:
– मयूर पांचाळ: 5350 मते
– स्नेहा गवळी: 5914 मते
– शीतल शेठ देवरुखकर: 5489 मते
– धनराज कोहचडे: 5247 मते
– शशिकांत झोरे: 5170 मते
– प्रदीप सावंत: 1338 पेक्षा जास्त मते (खुला प्रवर्ग)
– मिलिंद साटम
– परम यादव
– किसन सावंत
प्रदीप सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा खुल्या प्रवर्गातून विजय मिळवत त्यांना पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते मिळालीअसून, हॅटट्रिक साधली आहे. या विजयानंतर आदित्य ठाकरे आणि युवासेनेने मुंबई विद्यापीठातील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
Mumbai University
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा