Mumbai : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नालासोपाऱ्यातून समोर आलेल्या एका भयानक घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजपाच्या स्थानिक नेत्यासह तिघांविरोधात आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींमध्ये भाजपाचे वसई-विरार उपजिल्हाध्यक्ष आणि उत्तर भारतीय मोर्चाचे प्रभारी गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांचा समावेश आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि सहकारी नवीन सिंग यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर सामूहिक अत्याचार केला.
पीडित तरुणीने आरोप केला आहे की, आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत सतत अत्याचार केल्याचा आरोपासह इतर आरोप करण्यात आले आहेत.
याप्रकरणी आचोळे पोलीस तपास करत आहे.
राज्यभरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण पसरले आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
Mumbai
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ