Saturday, October 12, 2024
Homeजिल्हामोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

Akshay Shinde : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्कांऊटर केला असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

बदलापूरमधील एका शाळेतील दोन अलपवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेने पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस स्थानकात नेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलीसांवर गोळीबार केला असता पोलिसांनी केलेल्या प्रतिउत्तरात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. (Akshay Shinde)

मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. त्यानंतर अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या. त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली. तर 2 गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरांक्षणासाठी अक्षयवर गोळीबार केला.

Akshay Shinde

या संपुर्ण घटनेवर आता विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. विरोधी पक्ष आणि जेष्ठ वकिलांनी हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले

गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज

जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

संबंधित लेख

लोकप्रिय