Saturday, October 5, 2024
Homeराष्ट्रीयMassive fire : तामिळनाडूमधील टाटा कंपनीत भीषण आग (video)

Massive fire : तामिळनाडूमधील टाटा कंपनीत भीषण आग (video)

होसूर : तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूरजवळील टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. (Massive fire)

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादन सुविधेत शनिवारी सकाळी आग लागली.ही कंपनी Apple ची पुरवठादार आहे. आग लागल्यावर 1,500 पेक्षा अधिक कामगाराना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

“आमच्या होसुर येथील प्लांटमध्ये दुर्दैवी आगीची घटना घडली आहे. आमच्या आपत्कालीन प्रक्रियांनी सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली. आगीचे कारण सध्या चौकशीअंतर्गत आहे आणि आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची आणि इतर हितधारकांची सुरक्षा करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करणार,” असे टाटा इलेक्ट्रॉनिक्सने म्हटले आहे. (Massive fire)

आगीचा एक व्हिडिओही समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे. स्थानिक पोलीस आणि शासकीय मदत तातडीने या ठिकाणी मदतीला धावली आहेत.

कारखान्यात उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आणता आली नाही, तेव्हा रायकोट्टई आणि धेन्नीकोट्टई भागातील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या अजूनही आग विझवण्यात यश आले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू

धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले

संबंधित लेख

लोकप्रिय