Friday, April 26, 2024
Homeजिल्हाआशा गटप्रवर्तकांना वेतन सुसूत्रीकरणामध्ये आरोग्य विभागात सामावून घ्या - राजू देसले

आशा गटप्रवर्तकांना वेतन सुसूत्रीकरणामध्ये आरोग्य विभागात सामावून घ्या – राजू देसले

नाशिक : आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांना घेऊन गोल्फ क्लब मैदान ते जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) च्या वतीने तिरंगा मोर्चा काढण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, आरोग्य अभियान नाशिक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हाडपे, जिल्हा आशा गट प्रवर्तक समूह संघटक शरद नांगरे यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे : ‌‌

1. महाराष्ट्र शासनाने आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्याप्रमाणे आशा, गटप्रवर्तकांना वेतन सुसूत्रीकरणामध्ये समावेश करा, गटप्रवर्तकांना न्याय द्या.

2. गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. मोफत काम करून घेणे बंद करा.

3. गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करा.

4. आशा, गटप्रवर्तकांचे नाव बदलून आशा सुपरवायझर करा.

5. गटप्रवर्तकांमधून आरोग्य विभाग त 50 टक्के जागांची भरती करावी.

6. गटप्रवर्तकांना पगारी सुट्टी, किरकोळ रजा, बाळंतपण च्या पगारी रजा त्वरित लागू करा.

7. गटप्रवर्तकांना गाव भेटी वेळी वरिष्ठ अधिकारी सही घेण्यासंदर्भात घेतलेला निर्णय व फोटो सक्ती निर्णय रद्द करा.

8. पंतप्रधान मातृत्व वंदना कार्यक्रम आढावा ए एन एम व MPW कडून घ्या. गटप्रवर्तकांना कोणताही मोबदला मिळत नाही.

9. गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक द्या. प्रवास भत्ता च फक्त मिळत असल्याने गटप्रवर्तकांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर कामे मोफत व सक्ती ने करून घेणे बंद करा.

10. आशा सॉफ्टवेअर माहिती भरण्याचा मिळत असलेला मोबदला बंद केला आहे तो त्वरित चालू करा.

11. आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी चे महाराष्ट्र शासनाने वेतन सुसूत्रीकरण करतांना समान शिक्षण व कामाचे समान स्वरूप असतांना तालुका समूह संघटक (BCM) व जिल्हा समूह संघटक (DCM) यांच्या वेतनात तफावत आहे. याची दखल घेऊन तालुका व जिल्हा समूह संघटकांना न्याय द्यावा.

12. नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद वतीने कोरोना प्रोत्साहन भत्ता आशा व गटप्रवर्तकांना देण्यासंदर्भात पत्र गट विकास अधिकारी यांना दिले आहे. मात्र त्याची सर्वत्र अंमलबजावणी होत नाही. त्वरित 2 वर्ष चा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीना देण्यासाठी सांगावे. व अंमलबजावणी व्हावी.

13. दीपावली भाऊबीज भेट आशा, गटप्रवर्तकांना द्यावी.

14 केंद्र व राज्य शासनाचा मिळणारा मोबदला दरमहा 10 तारखेच्या आत मिळावा.

यावेळी राजू देसले, दिपाली पाटील, सुवर्णा लोहकरे, मायाताई घोलप, संध्या आहिरे, मनीषा खैरनार, दीपाली पाटील, यमुना पवार, प्रतिभा कर्डक, सुवर्णा बैरागी, व्ही. डी. धामणे, रंजना चौरे, पी. के. आहिरे,
सुवर्णा लोहकरे, एस. घेगडमल, व्ही. आर. वाघचौरे, आर.टी. साबळे, प्रीती नाईक, सुनंदा परदेशी, अरुणा ओगले, रंजना चौरे, एस.यु.पवार, सम्रता चौरे, एम. के. गायकवाड, सुमन बागुल, एम.ए. बरवे, वाय. बी.पवार, व्ही. डी.धामणे, वाय. ई. शेवाळे, सुमन भालके, गाडे एस. व्ही., सी.एस. पवार, कदम के. एस‌., वैशाली पवार, सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे आदींसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय