Tuesday, May 7, 2024
Homeआंबेगावनवक्रांती लाकडी तेलघाना व्यवसायातून आदिवासी महिला होत आहेत आर्थिक समृद्ध

नवक्रांती लाकडी तेलघाना व्यवसायातून आदिवासी महिला होत आहेत आर्थिक समृद्ध

घोडेगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ९ ऑगस्ट रोजी आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांनी आयोजित केलेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी स्टॉलला भेट देऊन माणकेश्वर येथील महिलांचे कौतुक केले. तसेच व्यवसाय वाढीसाठी सर्वोतोपरी सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने माणकेश्वर येथील दहा महिलांनी लाकडी तेलघाना व्यवसाय सुरू केला आहे. तीन ते चार महिन्यात या व्यवसायाने फार मोठी भरारी घेतली आहे. लाकडी तेलघण्यावरील तेलाचा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा होत असल्याने तेलासाठी प्रचंड मागणी होत आहे. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले तेल १००% शुद्ध असल्याने अनेक आजारांवर फायदेशीर असल्याने दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे.

नवक्रांती महिला उद्योग समूहाच्या संचालिका माधुरीताई सतिश कोरडे यांच्या प्रयत्नातून हा व्यवसाय उभा राहिला असून महिला सक्षमीकरण, शेतकरी व कामगार प्रश्न, आरोग्य व शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काम करत आहेत. त्यामुळे या सर्व महिलांचे समाजातून कौतुक होत आहे.

या वेळी प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, सुभाष मोरमारे, विजय आढारी आदी मान्यवर व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय