पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव येथील वाहनतळ मध्ये माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालक व चौकातील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी उभारलेल्या छत्री मध्ये बसणाऱ्या ज्येष्ठांसाठी पिंपळे गुरव कला क्रिडा संस्कार संस्कृती समिती संचलित शिव सहयाद्री ढोल पथकाच्या सौजन्याने आदिवासी दिपस्तंभ विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ डॉ. गोविंद गारे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडले. (Inauguration of Dr. Govind Gare Public Library at Pimple Gurav)
नाम फलकास ज्येष्ठ नागरिक मारुती उंडे यांनी नारळ वाढविला तर प्रसिद्ध लेखिका विजया नाग टिळक यानी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उपस्थित वाहनचालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये मारुती उंडे यांनी आम्हा ज्येष्ठांना विरंगुळा तर मिळतोच त्याच बरोबर बाह्य जगतात काय चालू आहे, याही घडामोडी कळतातष असे प्रतिपादन केले.
वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या समितीच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देत प्रभागात अशा स्वरूपाची आणखी दोन वाचनालये सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.
उद्घाटन समारंभास चौकातील वाहन चालक, ज्येष्ठ नागरिक तर शिव सहयाद्री पथकाचे सर्व वादक उपास्थित होते. यामध्ये प्रभाकर कांबळे (मेजर), विठ्ठल कदम, सोनार, राम कांबळे, अजय लोखंडे, मुन्ना वाल्हेकर, नेमिनाथ वाघमारे, रमेश साळसळ, तुकाराम कोल्हे, शंकर लोखंडे, चोथवे साहेब, जयदेव लोखंडे, साबळे साहेब, अशोक जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विद्या राजपूत यांनी तर सूत्रसंचालन सगुणा गारे यांनी केले.