Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयघरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट; फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याची कसरत सुरू!

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट; फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याची कसरत सुरू!

नवी दिल्ली : उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Domestic gas cylinders cheaper by Rs.200

गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार नाही. उज्ज्वला योजनेंतर्गत, सरकार आधीपासून 200 रुपये अनुदान देत होते, आता 200 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी एका वर्षात एकूण 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर अनुदान घेऊ शकतात. 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देतं. अनुदान मिळवण्यासाठी ग्राहकांना आधार क्रमांक एलपीजी कनेक्शनशी लिंक करावा लागतो. तसंच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार गॅस कनेक्शनशी जोडलेले असणेही आवश्यक आहे. 

मार्च 2023 पर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटींहून अधिक मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनचे वितरण केले आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तर लोकसभा निवडणुकाही जवळ येऊन ठेपल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे भडकलेले दर केंद्र सरकारला महागात पडू शकतात. याची जाणीव झाल्यानेच केंद्राने हे पाऊल टाकल्याची चर्चा आहे. मोदी सरकार फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावत आहे, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय