Monday, May 13, 2024
Homeजिल्हागटप्रवर्तकांना राज्य शासनाने कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे – कॉ....

गटप्रवर्तकांना राज्य शासनाने कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे – कॉ. राजू देसले

नंदुरबार : राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये गेली १६ वर्ष कार्यरत गटप्रवर्तकांना आरोग्य अभियान मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासन सेवेत सामावून घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन आयटक राज्यभर उभारेल असा इशारा कॉ. राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक यानी नंदुरबार येथे झालेल्या गट प्रवर्तक आशा मेळाव्यात दिला. Group promoters should be accommodated in government service – Com. Raju Desale

हॉटेल डी.एस.के. सभागृह नंदुरबार येथे आयटक वतीने गटप्रवर्तक व आशा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विचारमंचावर राज्य उपाध्यक्षा वैशाली खंदारे, मनीषा सहासे, गुली पावरा, रत्ना नंदन, मंदाकिनी पाटिल, ललिता माळी, देविदास नरभवरे, संध्या साळवे, रामेश्वरी वसावे, वसंत वाघ आदि उपस्थित होते.

 कोरोना काळात शहीद झालेल्या अंजना देविदास नरभवरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा कॉ. वैशाली खंदारे यांनी गटप्रवर्तकांना राज्य शासनाने कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करावे. उच्चशिक्षित गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी प्रमाणेच आम्ही काम करत आहोत. तरी शासनाचे आरोग्य अभियान मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी दखल घेऊन शासन सेवेत कायम करण्याबत बैठक आयोजित केली होती. त्यात गट प्रवर्तक समावेश नव्हता. हे अन्यायकारक आहे. त्वरित यात गटप्रवर्तकांचा समावेश करावा. अन्यथा तीव्र आंदोलन गटप्रवर्तक करतील असा इशारा दिला. ऑनलाइन ची प्रंचड कामे गट प्रवर्तक वर लादली जात आहेत. मात्र कोणतेही सुविधा दिली जात नाही. त्यामूळे येणाऱ्या काळात बहिष्कार टाकू असा इशारा दिला. मेळाव्यात उपास्थित गटप्रवर्तक आशा यांनी समस्या मांडल्या.

अध्यक्षीय समारोप करताना कॉ. राजू देसले यांनी केंद्र सरकार योजना कर्मचारी चे शोषण करत आहे. उच्चशिक्षित गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता देऊन काम करून घेत आहे. हा महिला गटप्रवर्तकांचा अवमान केंद्र सरकार करत आहे. कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करण्याबाबत राज्य सरकारने गट प्रवर्तक चा समावेश करावा अन्यथा तीव्र आंदोलन राज्यभर होईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मेळाव्यातील ठराव पुढीलप्रमाणे : 

१) गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करा.

२) गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करे पर्यंत कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या. आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी ना शासकीय सेवेत सामावून घेणे बाबत सूरू असलेल्या प्रक्रियेत गटप्रवर्तकांचा समावेश करावा.

३) केंद्र सरकारने २०१९पासून आशा गटप्रवर्तकांना मोबदला वाढ केली नाही, ती करावी. किमान वेतन लागू करा. सामाजिक सुरक्षा लागू करा

४) आशा गटप्रवर्तकानना ऑनलाईन ची कामे देऊ नयेत. 

५) दरवर्षी आशा गटप्रवर्तकांना दीपावलीला बोनस द्यावा.

याप्रसंगी उषा पावरा, अनिता महिरे, शेवंती मोरे, माधुरी पाटिल, सरला गिरासे, सुमित्रा वसावे, मालती वळवी, प्राजक्ता कापडणे, जेमा वळवी, शीला गावित, मोगी पाडवी , देवकी गावित, रंजना चव्हाण, मंजुळा सोनवणे, लक्ष्मी ठाकरे, अनिता जाधव नंदा राऊत, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयटक राज्यव्यापी जनजागरण यात्रा कामगार कर्मचारी धोरण विरोधात नंदुरबार जिल्हा येथे आल्यावर यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

DOT : पुणे येथे दूरसंचार विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची नवीन भरती

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

Group promoters should be accommodated in government service – Com. Raju Desale
Group promoters should be accommodated in government service – Com. Raju Desale
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय