Tuesday, April 30, 2024
Homeजिल्हाMurbad : घरावर पती-पत्नी दोघांच्या नावाची पाटी लावण्याचा ग्रामपंचायत किसळ - पारगावचा...

Murbad : घरावर पती-पत्नी दोघांच्या नावाची पाटी लावण्याचा ग्रामपंचायत किसळ – पारगावचा संकल्प

Murbad : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी महिलांच्या मालमत्तेच्या समान अधिकाराची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने घरावर पती व पत्नी दोघांची पाटी लावण्याचा संकल्प ग्रामपंचायत किसळ-पारगाव च्या वतीने करण्यात आला.

या प्रसंगी झालेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. कविता वरे-भालके होत्या. या सभेला पेसा अध्यक्षा भारती पारधी, सदस्य सुनिल पडवळ, पारगाव CRP सुनिता भालके, पेसा मोबलाझर निशा पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन ग्रंथालय सचिव जगदिश भालके यांनी केले. (Murbad)

यावेळी बोलताना डॉ.कविता वरे-भालके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आंबेडकरांच्या ध्येयाला घेऊन संकल्प केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे हार्दिक अभिनंदन केले. बाबासाहेबांनी या देशातील महिला वर्गासाठी केलेल्या असामान्य सर्वांगीण योगदानाचे त्यांनी विवेचन केले. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकांचे अटीतटीचे आव्हान समजावून सांगताना भारतीय जनता पार्टी व तिच्या तितक्याच भ्रष्ट व मित्र पक्षांचा दारुण पराभव करून या देशाचे संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आणि जनतेच्या जीवनमानाचे रक्षण करण्यासाठी मतदान करताना सजग राहून महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय