Sunday, April 28, 2024
HomeआंबेगावGhodegaon : कोळवाडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पार पडले साक्षरता संमेलन

Ghodegaon : कोळवाडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पार पडले साक्षरता संमेलन

Ghodegaon : आदिम संस्कृती अभ्यास,संशोधन व मानव विकास केंद्र, आंबेगाव यांच्या पुढाकारातून व रोटरी क्लब मेट्रो, रोटरी क्लब कोथरूड व इनर व्हील क्लब निगडी यांचे सहकार्याने कोळवाडी येथे साक्षरता वर्ग सुरु आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आदिम संस्थेच्या पुढाकारातून व गावातील महिलांच्या सहकार्यातून साक्षरता स्नेहसंमेलन पार पडले

दि.११ मार्च २०२४ रोजी रात्री ८ ते १० असा दोन तासांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यावेळी केले होते. या कार्यक्रमात गावातील साक्षरता वर्गातील महिलांनी, लहान मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. (Ghodegaon)

या सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी पारंपारिक गवळण, ‘साऊ पेटती मशाल’ हे गीत सादर केले. सावित्रीबाई फुले याचे आत्मकथन हे एकपात्री नाटकातून सादर केले, विविध मराठी गीते, याबरोबरच साक्षरतेचे महत्त्व सांगणारे नाटक तसेच अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे नाटक हिंदी कवितेतून ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश दिलाा, इ.कार्यक्रम सादर करण्यात आले.

हे कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला शुभेच्छा जनवादी महिला संघटनेच्या कमल बांबळे यांनी दिल्या. आदिम संस्थेचेराजू घोडे यांनी जे गावात साक्षरता वर्ग सुरु आहे. त्यातून जे बदल झाले आहे त्याचीही माहिती उपस्थितांना दिली व शिक्षण रोजच्या जगण्यात किती महत्वाचे हे सांगितले. (Ghodegaon)

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक साक्षरता वर्गाच्या स्वयंसेवक सुप्रिया मते यांनी मानले तर या कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बुरसे यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, आंबेगाव संस्थेचे राजू घोडे , समीर गारे, प्रा.स्नेहल साबळे, राहुल कारंडे तसेच कोळवाडी येथील साक्षरता वर्गाच्या स्वयंसेविका सुप्रिया मते, प्रियंका बुरसे, सुनंदा डगळे यांनी केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कोळवाडी – कोटमदरा, रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड पुणे, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांचे सहकार्य लाभले.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय