Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याBJP Candidate List : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २०...

BJP Candidate List : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

BJP Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. Maharashtra Lok Sabha Election list

भाजपने जाहीर केलेल्या या यादीत राज्यातील २० उमेदवारांच्या नावांचा सामावेश आहे. (BJP Candidate List) या यादीत भाजपच्या दिग्गज नेत्यांचा सामावेश आहे. या यादीत नितीन गडकरी, पंकजा मुंडे, पियुष गोयल सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे आदी नेत्यांच्या नावांचा सामावेश आहे. तर काही नेत्यांना डच्चू मिळाला आहे.

जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

संपुर्ण उमेदवारी

नागपूरमधून नितीन गडकरी, बीडहून पंकजा मुंडे तर पुण्याहून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबार- हीना गावित, धुळे- सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनूप धोत्रे, वर्धा- रामदास तडस, नागपूर- नितीन गडकरी, चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार, नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर, जालना- रावसाहेब दानवे, डिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा, पुणे- मुरलीधर मोहोळ, अहमदनगर- सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर श्रुंगारे, माढा- रणजितसिंह नाईक, निंबाळकर, सांगली- संजयकाका पाटील अशी उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP Candidate List)

whatsapp link

हे ही वाचा :

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय

जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय