Friday, May 10, 2024
Homeजुन्नरJunnar : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

Junnar : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील घाटघर येथील एक महत्वाची बातमी समोर येत आहे. किरकोळ वादातून झालेल्या खून प्रकरणातून एकाच कुटुंबातील ७ पुरुषांना राजगुरुनगर (ता. खेड) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. Junnar

घाटघर येथे ३० ऑक्टोबर २०१४ मध्ये भात काढण्याच्या वादातून गंभीर जखमी झालेल्या मारुती लक्ष्मण रढे यांचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला होता या प्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

यशवंत दूंदा रढे यांच्या कुटुंबातील हौसाबाई यशवंत रढे, मारुती लक्ष्मण रढे, सखूबाई मारुती रढे, नावजी देवजी रढे, काळाबाई नावजी रढे, रूपा देवाजी रढे, अंजना रूपा रढे हे शेतात भाताची काढणी करत होते. त्यावेळी शांताराम नावजी रावते, लक्ष्मण नावजी रावते, मारुती नावजी रावते, तान्हाजी नावजी रावते, दत्तु नावजी रावते, फासाबाई शांताराम रावते, लीलाबाई मारुती रावते, लताबाई तान्हाजी रावते, लक्षाबाई नावजी रावते, मधुकर नावजी रावते, नावजी महादू रावते, राजू दत्तू रावते, गुलाब युवराज साबळे यांनी ‘तुम्ही आमचे शेतात भाताचे पीक कसे काय काढता?’ असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांच्यात तुफान हाणामारी झाली.

या हाणामारी दरम्यान, मारुती लक्ष्मण रढे तसेच रूपा देवजी रढे, नावजी देवजी रढे, सखूबाई मारुती रढे हे गंभीर जखमी झाले, या मारहाणीत मारुती लक्ष्मण रढे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात खून, मारहाणीबाबत गुन्हा नोंदविला. Junnar

या प्रकरणी राजगुरुनगर (ता. खेड) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी (ता. १२) शांताराम रावते, लक्ष्मण रावते, मारुती रावते, तान्हाजी रावते, दत्तू रावते, गुलाब साबळे, मधुकर रावते या एकाच कुटुंबातील सात जणांना जन्मठेपेची आणि एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. फासाबाई रावते, लीलाबाई रावते, लक्षाबाई रावते, लताबाई रावते यांना ६ महिने सश्रम कारावास व राजू रावते यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी ही शिक्षा ठोठावली.

whatsapp link

हे ही वाचा :

महत्वाची बातमी : यापुढे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक, ‘असा’ नावाचा असेल अनुक्रम

मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय