Sunday, May 12, 2024
Homeताज्या बातम्याSupreme Court : इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला...

Supreme Court : इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

निवडणूकी अगोदरच मिळणार इलेक्टोरल बाँड्सची माहिती

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) एक महत्वाची बातमी येत आहे. सर्वोच्च न्यायालयात इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासंदर्भातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्टेट बँकेला मोठा दणका दिला आहे. Supreme Court on SBI

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. इलेक्टोरल बाँड प्रकरणात आणखी वेळ मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या स्टेट बँकेची (SBI) याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने स्टेट बँकेला (SBI) उद्या पर्यत म्हणजे मंगळवारी १२ मार्चपर्यंत उपलब्ध डेटा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने १५ मार्चपर्यंत डेटा अपलोड करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा एसबीआयला मोठा धक्का बसला आहे. Supreme Court on SBI

सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला खडसावले

स्टेट बँकेने न्यायालयात बाँडशी संबंधित माहिती देण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही, परंतु त्यासाठी थोडा वेळ हवा आहे, अशी मागणी केली असता न्यायाधीशांनी एसबीआयला खडसावले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, गेल्या सुनावणीपासून (१५ फेब्रुवारी) २६ दिवसांत तुम्ही काय केले?

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यावेळी स्टेट बँकेच्या वतीने वकील हरीश साळवे (Harish Salve) यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, जर एसबीआयने या आदेशाचे पालन केले नाही, तर न्यायालयाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने एसबीआयवर अद्याप कारवाई केलेली नाही, असे म्हटले आहे, परंतु जर या आदेशाचे पालन केले नाही तर कारवाई का करू नये?

whatsapp link

हे ही वाचा :

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय