Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना...

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

Rabindra Waikar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. जोगेश्वरी माजी आमदार रवींद्र वायकर (Rabindra Waikar) यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. Ravindra Waikar joins Eknath Shinde’s Shiv Sena

रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शनिवारी उद्धव ठाकरे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना वायकर यांनी उद्धव यांचे स्वागत केले होते, मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. रवींद्र वायकर (Rabindra Waikar) यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

रवींद्र वायकर ईडी चौकशी

दरम्यान, जोगेश्वरीच्या वेरावली गावातील जमिनीचा गैरवापर करून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधल्याच्या प्रकरणातही रवींद्र वायकर यांचे नाव पुढे आले आहे. या जमिनीत ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीच्या आधारे ईडीचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

संबंधित लेख

लोकप्रिय