Friday, May 10, 2024
Homeजिल्हाखळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे

Drugs : पुणे जिल्ह्यासारख्या निसर्गाने नटलेल्या जिल्ह्यात शेतीत अनेकांकडून अफू अन् गांजाचे (Drugs) उत्पादन जोरात सुरू असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या डोळ्यात शेतीच्या ‘आड’ हा गोरखधंदा सुरू असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी काही दिवसांत छापेमारी करीत ७ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. Pune Drugs

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून १४ किलो अफूची बोंडे (Drugs) जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तानाजी शांताराम हगवणे (४८) आणि शिवाजी बबन हगवणे (५५, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

किरकटवाडीतील नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ आरोपी हगवणे यांची शेती आहे. शेतात बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. हगवणे यांनी शेतात अफूची (Drugs) लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे. या दोघांविरुद्ध अमली पदार्थ विराेधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक राहुल वांगडे, विकास अडागळे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू वीरकर, दिलीप आंबेकर, अशोक तारु यांच्या पथकाने केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास आडागळे करत आहेत.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात अफू लागवड करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले होते. सासवड परिसरातील कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची (Drugs) लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला होता.

जिल्ह्यातील ७ ठिकाणी कारवाई

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अफूची लागवड होत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण पोलिसांनी गेल्या काही महिन्यात ७ गावांमध्ये छापेमारीकरत अफूची शेती(Drugs) केल्याचे उघडकीस आणले आहे. यापुर्वी जिल्ह्यातील घोडेगाव, शिक्रापूर, सासवड, जेजूरी, भिगवन, यवत, हवेली येथे कारवाई केली असून, ७ कारवायांमध्ये ३६५ किलो अफू जप्त केला आहे. तसेच, आता किरकटवाडीत आठवी कारवाई केली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय

जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय