Wednesday, May 22, 2024
Homeजिल्हाझिरो टी पॉईंट येथील ड्रेनेज सिस्टीम व भुयारी मार्गाबाबत वरिष्ठ अभियंत्यांना डीवायएफआय...

झिरो टी पॉईंट येथील ड्रेनेज सिस्टीम व भुयारी मार्गाबाबत वरिष्ठ अभियंत्यांना डीवायएफआय चे निवेदन

पूर्णा : झिरो टी पॉईंट येथील ड्रेनेज सिस्टीम व भुयारी मार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, पूर्णा चे वरिष्ठ अभियंत्यांना डीवायएफआय च्या वतीने निवेदन देण्यात आले. DYFI’s Memorandum to Senior Engineers regarding Drainage System and Subway at Zero T Point

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मागील किमान 2 वर्षांपासून नांदेड व हिंगोली रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गाबाबत व झिरो टी पॉईंट येथील ड्रेनेज सिस्टीम बद्दल आपल्याशी कधी तोंडी व कधी पत्र्यव्यवहार करीत आलेलो आहोत. भुयारी मार्गाबाबत कायमच आपल्याकडून टाळाटाळ करण्यात आलेली आहे.

ड्रेनेज सिस्टीमबद्दल चालढकल केल्यामुळे मागच्या वर्षी जेव्हा खूप जास्त पाणी त्याठिकाणी साचले होते,  तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला. तेव्हा त्यांच्या आदेशावरून पाईपलाईन टाकल्या गेली. परंतु ती योग्यप्रकारे न टाकल्यामुळे भुयारी मार्गावर कंबरेपर्यंत पाणी जमा होत आहे. ज्यामुळे विविध अपघात घडत आहेत.

कालच एक बस नाल्यामध्ये उतरली. लोकांचे जीव गेले तर याला जबाबदार कोण? भुयारी मार्ग पक्का बांधला जावा म्हणून आम्ही डीवायएफआय कडून रेल्वे विभाग, MRIDC, नगर पालिका प्रशासन व आपल्या विभागाला पाठपुरावा केला. परंतु सगळीकडूनच टाळाटाळ केल्या जात होती. शेवटी वर्ष-दीड वर्ष MRIDC च्या अधिकाऱ्यांना सतत कॉल्स व msgs केल्यावर त्यांनी मनावर घेऊन मागील वर्षी तो रस्ता केला होता. परंतु ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित न केल्यामुळे व तेथे पावसाचे पाणी साचल्यामुळे एवढ्या प्रयत्नांनंतर केलेला तो रस्ता पूर्णतः उखळून गेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार आपले प्रशासन आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

तसेच ताबडतोब तेथील ड्रेनेज सिस्टीम दुरुस्त करून ही समस्या सोडवावी. तसेच हा भुयारी मार्ग सुद्धा RTI नुसार आपल्या अंतर्गत येतो म्हणून आपण तो सुद्धा पक्का बांधून देण्यात यावा. अन्यथा पुढील आठवड्यात झिरो टी पॉईंट पासून सदर कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्याचा इशारा डीवायएफआय च्या वतीने देण्यात आला आहे. 

निवेदन देतेवेळी डीवायएफआय चे नसीर शेख, जय एंगडे, प्रबुद्ध काळे हे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय