Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमावळ येथील कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मावळ येथील कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली, जाधववाडी येथील संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सीताताई केंद्रे यांनी कुसवली, मावळ येथील आदिवासी कातकरी कुटुंबातील महिला मुलींना साड्या, कपडे, पादत्राणे यांचे वाटप केले. Distribution of essential items to Katkari families in Maval

कुसवली येथील कातकरी समाज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतो. पावसाळ्यात येथे कोणतेही काम नसते. जुलै 2023 मध्ये सीताताई केंद्रे यांनी येथील कुटुंबाना किराणा वितरण केले होते. त्यावेळी येथील महिला मुली व मुलांना पुरेसे कपडे आणि पायात चप्पल नसल्याचे पाहून त्यांनी श्रावण महिन्यात साड्या, मुला-मुलींना कपडे, पादत्राणे देण्याचे आश्वासन दिले होते.

येथील एकूण 15 मुले-मुली, 20 महिलांना नवीन साड्या, कपडे पादत्राणे वितरणाचा उपक्रम संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट च्या वतीने राबवण्यात आला.

यावेळी उद्योजक नीरज भटनागर, उद्योजक बाबूलाल चौधरी तसेच संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टच्या माया सांगवे, बालाजी कांबळे, दत्ता सांगवे, जयराम हंगे, हिरकांत भोंग यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वुई टूगेदर फाउंडेशनच्या आदिवासी सक्षमीकरण व सेवा केंद्राचे संचालक चंद्रकांत खांडभोर, योगेश गोंठे यांनी सीताताई केंद्रे यांच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती

Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

Distribution of essential items
Distribution of essential items
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय