Thursday, May 9, 2024
Homeराज्यपुण्याच्या शिक्षिकेचा देशात डंका, राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव

पुण्याच्या शिक्षिकेचा देशात डंका, राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव

पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, यात पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. national teacher award announced to mrinal ganjale shinde

देशात एकूण 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातून मृणाल गांजाळे या एकमेव शिक्षिकेचा पुरस्कारांच्या यादीत समावेश आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदाही मंत्रालयाकडून शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी 50 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

मृणाल गांजाळे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव, महाळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. 2023-24च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलोच्या मानकरीही ठरल्या आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मृणाल गांजाळे यांचे अभिनंदन केले आहे. गांजाळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड राज्यस्तरीय निवड समितीने केली होती व राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्याबद्दल राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण आयुक्‍त म्हणून त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती

Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

national teacher award announced to mrinal ganjale shinde
national teacher award announced to mrinal ganjale shinde
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय